Uttarkashi Tunnel Rescue Operation Latest News : मागील 17 दिवसांपासून उत्तरकाशी येथील बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांच्या आयुष्याच्या नवीन सूर्योदय झाला आहे. भारतीय लष्कर (Indian Army), एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफसह (NDRF) विविध यंत्रणांनी अथक प्रयत्न केले. या बचाव मोहिमेत मोलाची रॅट मायनिंग करणाऱ्या मजूरांनी मोलाची भूमिका बजावली. बोगद्यातून पहिले दोन मजूर बाहेर आल्यानंतर या बचाव मोहिमेतील रॅट मायनिंग करणाऱ्या मजूरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळेजण सुखरूप असून सगळ्यांचे प्राण वाचणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया रॅट मायनिंगमधील मजुरांनी दिली. 


गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या.






रॅट मायनिंग पथकातील मजूराने या बचाव मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या पथकातील एका मजुराने सांगितले की, बोगद्यात अडकलेले सगळे मजूर व्यवस्थित होते. हाताने राडरोडा काढणे, त्यांच्यापर्यंत पोहचणे हे अडचणीचे काम होते, पण लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे होते आणि त्यात यशस्वी झालो याचा आनंद वाटत असल्याचे या रॅट मायनिंग पथकातील मजुराने सांगितले. पहिले दोनजण बाहेर आल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे त्याने म्हटले. 


बोगद्यात अडकलेल्या मजुरांची चार-चार जणांच्या गटाने सुटका करण्यात येत आहे. सगळ्यांची प्रकृती चांगली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 






 


मशिनचा निरुपयोगी ठरल्या, रॅट मायनिंगचा वापर कामी 


मजुरांच्या सुटकेसाठी 80 मीटर व्यास असलेल्या 10 मीटर पाईप टाकण्याचे काम मागील चार दिवसांपासून थांबले होते. ड्रिल करणारी ऑगर मशीन तुटली असल्याने तिकडेच अडकली आहे. फक्त 48 मीटरपर्यंत ड्रिलिंग झाले होते. त्यावर पर्याय म्हणून लष्कराचे जवान टेकडीच्या माथ्यावरून उभ्या ड्रिलिंग करत असून ते 30 मीटरपर्यंत करण्यात आले आहे. मात्र तेथेही पाणी आल्याने काम थांबले आहे. अवजड मशिन्स निकामी झाल्यानंतर आता 41 मजुरांना वाचवण्यासाठी रॅट मायनिंगचा वापर करण्यात आला. 


उंदरांप्रमाणेच, एका छोट्या जागेत वेगाने खोदणारी मजुरांचे एक पथक बचाव कार्यात आले.  त्यांच्याकडे हातोडा, फावडा आणि इतर पारंपारिक खोदकामाची साधने होती. दिल्ली आणि अहमदाबादमध्ये या प्रकारच्या कामाचा अनुभव असलेल्या 6 खाण कामगारांची टीम येथे पोहोचली होती.