Uttarakhand : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे पर्वताच्या शिखरावर झालेल्या हिमस्खलनात (28 mountaineers trapped) 28 जण अडकले असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना घडली तेव्हा किमान 170 गिर्यारोहकांचा एक गट प्रशिक्षण घेत होता. हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून एसडीआरएफची टीम आता रवाना झाली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत माहिती दिली असून, दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तसेच 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगितले.
7 जणांना वाचवण्यात यश, 21 जणांचा शोध सुरू
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे 28 प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक हिमस्खलनात अडकले आहेत. यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आले असून 21 जणांचा शोध सुरू आहे. भारतीय हवाई दलाचे दोन चित्ता हेलिकॉप्टर बचाव कार्यात तैनात आहेत. या घटनेच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी लष्कराची मदत मागितली होती. सीएम धामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की - द्रौपदीच्या दांडा -2 पर्वत शिखरावर हिमस्खलनामुळे उत्तरकाशी येथील नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 28 प्रशिक्षणार्थी अडकल्याची माहिती मिळाली आहे.
बचावकार्य सुरू
धामी म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची विनंती केली असून त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सर्वांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमस्खलनाची माहिती मिळताच आयएएफची कारवाई सुरु करण्यात आली. या घटनेतून बचावलेल्या प्रशिक्षणार्थींना सध्या ITBP संचालित हेलिपॅडवर आणले जात आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या गिर्यारोहक संघाला हिमस्खलनाचा फटका बसलेल्या उत्तरकाशी भागात बचाव आणि मदतकार्यासाठी IAF द्वारे 2 हेलिकॉप्टर तैनात केले होते. आयएएफ अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, इतर काही आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टरच्या इतर सर्व ताफ्यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.
2 चीता हेलिकॉप्टर तैनात
तर संरक्षण मंत्री म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मी हवाई दलाला बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, आयएएफच्या बचाव पथकाने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तरकाशी प्रदेशात बचाव आणि मदत कार्यासाठी आयएएफने तैनात केलेले 2 चीता हेलिकॉप्टर तैनात आहेत. इतर सर्व हेलिकॉप्टरचा ताफा इतर कोणत्याही गरजांसाठी स्टँडबायवर ठेवण्यात आला आहे.