KCR to Announce His National Party Name : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) हे विविध राजकीय पेक्षांच्या भेटी गाठी घेत आहेत. तसेच सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच के चंद्रशेखर राव यांनी आता राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर ते राष्ट्रीय पक्षाचे नाव घोषीत करण्याची शक्यता आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (Telangana Rashtra Samithi) आता राष्ट्रीय स्तरावर राजकारणात सक्रिय होणार आहे.


मुख्यमंत्री  के चंद्रशेखर राव यांच्या हैदराबादमधील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा भवनात दसऱ्याच्या दिवशी तेलंगणा राष्ट्र समितीची (TRS)बैठक होणार आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार पक्षाची सर्वसाधारण सभा 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तेलंगणा भवन येथे होणार आहे. या बैठकीला नेत्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. के चंद्रशेखर राव हे 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या सर्वसाधारण सभेलाही संबोधित करु शकतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे एक शिष्टमंडळ त्यांच्या पक्षाचे नाव बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत येणार आहेत. दरम्यान, के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा  नेमका अजेंडा कोणता हे हैदराबादच्या बैठकीनंतर सांगता येईल.


राष्ट्रीय पक्षाच्या नावासंदर्भात टीआरएसनं काय म्हटलं?


तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते श्रीधर रेड्डी म्हणाले की, देशातील नागरिक एक मजबूत व्यासपीठ शोधत आहेत. कारण राज्यकारभाराच्या सर्व पैलूंमध्ये एनडीए अपयशी ठरले आहे. केसीआर यांनी राष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरात मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरले असून देश एक मजबूत पर्याय शोधत असल्याचे श्रीधर रेड्डी म्हणाले. लवकरचके चंद्रशेखर  राष्ट्रीय पक्षाचे नाव जाहीर करतील, असेही श्रीधर रेड्डी म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात विविध घडामोडी घडत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  हे सातत्यानं भाजपच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका मांडत आहेत. 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव हे विविध राज्यातील नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. दरम्यान, के चंद्रशेखर राव यांनी  'भाजप मुक्त भारत' असा नारा देत तेलंगणा राष्ट्र समिती  राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


KCR Challenges: के. चंद्रशेखर राव यांचा 'भाजप मुक्त भारत'चा नारा, TRS राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार