Uttarakhand Election 2022 Date : उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीची (Uttarakhand Election) घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. उत्तराखंडमध्ये यावेळी एकाच टप्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 14 फेब्रुवारी 2022 रोजी उत्तराखंड विधानसभेसाठी मतदान होईल तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठीची आचारसंहिताही आजपासून लागू झाली आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून या निवडणुका घेतल्या जातील अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
उत्तराखंडमध्ये सध्या भाजपचं पूर्ण भहुमताचं सरकार आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 57, काँग्रेसला 11 तर इतर पक्षांना दोन ठिकाणी विजय मिळवता आला होता. 23 मार्च 2022 रोजी उत्तरांखंड विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे.
उत्तराखंडमध्ये कोणाचे सरकार येईल?
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येणार यावरून बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या राज्यात आजपर्यंज भाजप आणि काँग्रेस सत्तेत राहिले आहेत. तर बीएसपी या पक्षाची उत्तराखंडमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. उत्तराखंच्या निर्मितीनंतर पहिल्या तीन विधानसभेत बीएसपी हा तिसरा मोठा पक्ष ठरला होता. परंतु, 2017 च्या निडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तराखंडच्या हरिद्वार आणि नैनीतालमध्ये अनेक जागांचा निकाल हा शेतकऱ्यांच्या मतांवर ठरतो. या भागांत शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
- ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता