Reena Dwivedi : 2019 च्या उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकांमध्ये रीना द्विवेदी या निवडणूक अधिकारी त्यांच्या पिवळ्या साडीतील लूकमुळे चर्चेत होती. रीना द्विवेदी यांचा लिंबू कलरची साडी आणि गॉगल असा लूक करून मतदानपेटी घेऊन मतदान केंद्रावर जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. आता रीना द्विवेदी यांचा यंदाच्या निवडणुकीदरम्यानचा फोटो देखील व्हायरल होत आहे. रिना या नक्की कोण आहेत? आणि त्या का चर्चेत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात रिना यांच्याबद्दल....
उत्तर प्रदेशमधील देवरियाची येथे रीना द्विवेदी राहतात. त्या लखनौमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सहाय्यक कनिष्ठ क्लर्क या पदावर काम करतात. त्यांना आदित्य द्विवेदी नावाचा मुलगा आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे. रीना यांचे इन्स्टाग्रामवर 258k फॉलोवर्स आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्या पोल ड्युटीवर होत्या आणि त्यानंतर 2018 च्या महापालिका निवडणुकीत त्या मतदान केंद्र अधिकारी झाल्या.
2019 मध्ये व्हायरल झालेल्या फोटोमुळे रीना द्विवेदी चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांना भोजपूरी चित्रपटांच्या ऑफर्स देखील येत होत्या. पण त्या ऑफर्स नाकारून मुलाचे शिक्षण सुरू असल्यानं त्यांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. 22 फेब्रुवारी रोजी रीना यांचा दुसरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये रिना या ब्लॅक टॉप, ऑफ व्हाईट कलरची पँट आणि हातात रेड बॅग अशा लूकमध्ये दिसत आहेत. बदलेल्या लूकबद्दल जेव्हा रीना यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, 'थोडा बदलं करायला पाहिजे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Central Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज
- एक लाख पगाराची नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, आत्ताच अर्ज करा
- UP Election Voting : यूपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया, 59 जागांसाठी 624 उमेदवार रिंगणात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha