लखनौ: गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी नेताना त्यांची हत्या झाली. प्रयागराज या ठिकाणी त्यांची हत्या झाली आहे. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. 


 






अतिक अहमद 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातही प्रमुख आरोपी होता. यापूर्वी अतीकचा मुलगा असद अहमद 13 एप्रिल रोजी झाशीमध्ये चकमकीत मारला गेला होता. त्यासोबत शूटर गुलामलाही यूपी एसटीएफने मारले होते.


अतिक अहमद आणि अश्रफ अहमद या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात असताना तीन लोक आले आणि त्यांनी त्यांची हत्या केली. या तीन हल्लेखोरांपैकी एका व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 


अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये खून, खंडणी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. 


 






अतिक अहमदच्या मुलाचा एन्काऊंटर


दोनच दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा आणि कुख्यात गँगस्टर असद अहमदचा एन्काऊंटर करण्यात आला होता. उमेश पाल खून (Umesh Pal Murder Case) प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. त्याच्यासोबत गुलाम नावाच्या शूटरचाही एन्काऊंटर करण्यात आला होता. 


अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनाचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीच्या एसटीएफसोबत (UP STF) झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे.   एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.. प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात दोघंही ठार झाले. या दोघांवरही पाच-पाच लाखांचं बक्षीस होतं.


ही बातमी वाचा: