Declining Camel Population in India:  राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) देशभरात उंटांची घटती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक उंट असून हा तेथील राज्य प्राणी आहे. थारच्या वाळवंटातील राजस्थानला उंटांचे माहेरघर असेही म्हटले जाते. उंटाची संख्या सातत्याने कमी होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये आता तीन लाखांहून कमी उंट शिल्लक आहेत. राजस्थान व्यतिरिक्त आसाम, केरळ, कर्नाटक, गुजरात, हरियाणा आणि पंजाबमध्येही उंट आढळतात.


देशात किती कमी झाली उंटांची संख्या 


2012 ते 2019 दरम्यान, संपूर्ण भारतातील उंटांची संख्या सुमारे 1.5 लाखांनी कमी होऊन 2.52 लाख झाली. भारत सरकारने डिसेंबर महिन्यात संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, 2012 च्या पशुधन गणनेत देशातील उंटांची एकूण संख्या 1.17 लाखांवरून चार लाखांवर आली, जी 2019 च्या पशुगणनेत 1.48 लाख आणि 2.52 लाख इतकी कमी झाली आहे.


गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात किती उंट शिल्लक? 


देशातील सुमारे 85 टक्के उंट राजस्थानमध्ये आढळतात. यानंतर गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये राजस्थानमध्ये उंटांची संख्या 3,25,713 होती, जी 2019 मध्ये 1,12,974 ने घटून 2,12,739 झाली. दरम्यान, गुजरातमध्ये उंटांची संख्या 30,000 वरून 28,000 वर आली आहे. हरियाणात ही संख्या 19,000 वरून 5,000 पर्यंत खाली आली आहे. तर उत्तर प्रदेशात याची संख्या 8,000 वरून 2,000 वर आली आहे. नागालँड, मेघालय यांसारख्या राज्यांमध्ये अधिकृतपणे एकही उंट शिल्लक नाही.


महत्त्वाच्या बातम्या: