Bengal Assembly : पश्चिम बंगालमध्ये टायपिंगच्या चुकीमुळे विधानसभेचे अधिवेशन दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठी राज्यपालांना पाठवलेल्या प्रस्तावात सोमवार, 7 मार्च 2 pm (दुपारी 2) ऐवजी 2 am (मध्यरात्री 2) ची वेळ टाईप करण्यात आली होती. आज राज्यपाल जगदीप धनखर यांनी दुपारी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावले होते, मात्र उच्चपदस्थ अधिकारी राज्यपालांपर्यंत पोहोचले नाहीत. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र दुपारी दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी ही टाईप मिस्टेक असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांना ती दुरुस्त करता आली असती, पण त्यांनी दुपारी दोन वाजता प्रकारची चूक मान्य केल्याने आता विधानसभेचे अधिवेशन रात्रीच सुरू होणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये अधिवेशनाची वेळ दुपारी 2 वाजता लिहिली होती. त्यानंतर चुकून पहाटे 2 वाजताची वेळी पाठवली गेली, राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकतात.
मात्र, पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज दुपारी 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल. असंही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. गुरुवारी, राजभवनाच्या वतीने, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा तिढा; आता 2 मार्च रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
- Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर; जाणून घ्या राज्यातील इंधनाचे दर
LIVE TV मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha