Yogi Adityanath Threat : नामांकित आणि प्रसिद्ध व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी मिळणे ही गोष्ट काही नवीन नाही. अगदी पंतप्रधानांपासून सर्वच नामांकित व्यक्तींना कधी ना कधी या गोष्टीला सामोरे जावे लागते. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य. पण गेल्या काही काळात या राज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. या राज्यात बरेच बदल देखील करण्यात आले आहेत. आता याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) 23 एप्रिल रोजी रात्री 112 या नंबरवरुन एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 112 या नंबरवरुन एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांना अशी धमकी आल्यानंतर त्याच्या सुरक्षारक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. खरंतर योगी आदित्यनाथ यांना आलेली ही दुसरी धमकी आहे. जेव्हा हा मेसेज आला तेव्हा योगींची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि या धमकीची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करुन गुन्हा देखील नोंदवण्यात आला. कलम 506 आणि 507 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कलम 66 लावण्यात आले आहे. लखनौमधील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर्याने दखल घेतली असून कसोशीने या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
याआधी फेसबुकवर आली होती धमकी
योगी आदित्यनाथ यांना मिळालेली ही दुसरी धमकी आहे. याआधी देखील मुख्यमंत्री योगींना अशा प्रकारची धमकी मिळाली होती. योगी सरकार उत्तर प्रदेशात घेत असलेल्या कठोर निर्णायांमुळे त्यांना अशाप्रकारच्या धमक्या मिळत असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. एका आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री योगी यांना फेसबुकवर धमकी मिळाली होती. एका व्यक्तीकडून फेसबुक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात योगींना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यांनतर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली होती.
पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
दम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. शनिवारी 22 एप्रिल रोजी केरळचे मुख्यमंत्री के.सुरेंद्रन यांना पंतप्रधनांच्या धमकीचे पत्र मिळाले. पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला. केरळ पोलिसांकडून आरोपीला अटक देखील करण्यात आली.
हेही वाचा