केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेण्यात आलेल्या युपीएससीच्या आयईएस आणि आयएसएस परीक्षेचा निकाल (UPSC results) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, युपीएससीची ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनाupsc.gov.in" target="_blank"> upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येईल. या पदांसाठी जानेवारी 2025 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर, सप्टेंबर महिन्यात मुलाखत आणि व्यक्ती परीक्षण करण्यात आले. आता, या परीक्षेसाठी निकाल जाहीर करण्यात आला असून IES पदासाठी 12 आणि आयएसएस पदासाठी 35 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
युपीएससी 2025 च्या जाहीर झालेल्या निकालानुसार, आयईएस म्हणजे भारतीय आर्थिक सेवेत मोहित अग्रवाल नदबईवाला याने पहिले स्थान पटकावले आहे. तर, ऊर्जा रहेजा दुसऱ्या स्थानावर असून गौतम मिश्रा तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) 2025 साठी झालेल्या परीक्षेत कशिस कसानाने देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यानंतर, आकाश शर्मा दुसऱ्या स्थानावर असून शुभेंदू घोष तिसरा आला आहे. आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी 12 उमेदवारांची निवड अंतिम करण्यात आली आहे. मूळ कागदपत्रांच्या सांक्षाकिंत प्रती घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल, असेही युपीएससीने म्हटले आहे.
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI