UPI Server Down: देशातील युनिफाइड पेमेंट इंटरफेस सर्वर डाऊन झाल्याची माहिती समोर आलीय. यूपीआय (UPI) सर्व्हर डाऊन झाल्यानं गूगल पे (Google Pay), फोन पे  (PhonePe) किंवा पेटीएमद्वारे (Paytm) ऑनलाईन डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. डिजिटल पेमेंट सुविधा पूर्णपणे बंद पडल्यानं सोशल मीडियावर ग्राहकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.


यूपीआय सर्व्हरमध्ये तांत्रिक अजचणी आल्यानं काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या. सध्या सर्व्हर पूर्ववर होण्याचं काम सुरु झालंय. आम्ही संपूर्ण सिस्टमवर लक्ष ठेवून आहोत, असं ट्वीट एनपीसीआयनं केलंय. याशिवाय, आयसीआयसीआय बँकनंही यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती दिलीय. 


ट्वीट-



इन्स्टंट पैसे पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी, युटिलिटी बिल्स भरण्यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. हे व्यवहार करताना ग्राहकांना काही वेळा समस्यांना सामोरं जावं लागलंय. त्याबाबत असंख्य तक्रारीही आल्या आहेत. प्रत्येक यूपीआय मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्यवहारांशी संबंधित तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. 


डिजिटल युगात विना इंटरनेट वापर करता डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एक पाऊल पुढं टाकलंय. आता या डिजिटल क्रांतीत पेटीएमही उतरलंय. पेटीएमनं ग्राहकांसाठी ‘टॅप टू पे’ सुविधा सुरू केलीय. या सुविधेमुळं मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरी डिजिटल व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. टॅप टू पे या सुविधेचा सध्या अँड्रॉइड आणि आयओएस या मोबाईलधारकांना लाभ घेता येईल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha