लखनऊ : उत्तर प्रदेश बोर्डाच्या (UPMSP) दहावी आणि बारावीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे हे निकाल एक महिना उशिरा जाहीर करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांना हे निकाल उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. विद्यार्थी वेबसाइटच्या होम पेजवरच निकाल पाहू शकणार आहेत. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा म्हणणं आहे की, यावर्षीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला लागला आहे.


दरम्यान, दहावीचे 83.31 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यंदाही मुलींनी बजी मारली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी उत्तम असल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सांगितल्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये 52 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच पुढे ते म्हणाले की, फक्त 21 दिवसांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्याचं एक आव्हानच होतं.


दिनेश शर्मा पुढे बोलताना म्हणाले की, 'यावेळी एकत्रच 18 फेब्रुवारी रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या होत्या. दहावीच्या परीक्षा 3 मार्च रोजी आणि इंटरची परीक्षा 6 मार्च रोजी संपली.'


बागपतची रिया जैन 10वीत टॉप

यंदा बडौत-बागपतची रिया जैन ही दहावीत पहिली आली आहे. रियाला 96.67 टक्के मार्क्स मिळाले आहेत. तर अभिमन्यु वर्मा हा राज्यात दुसरा आला असून त्याला 95.83 टक्के मार्क्स मिळालेत. तर योगेश प्रताप सिंह आणि राजेंद्र प्रताप सिंह या दोन विद्यार्थ्यांनी 95.33 टक्के मार्क्स घेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

12वीत अनुराग मलिक प्रथम

बारावीच्या परीक्षेत बागपतच्या श्री राम एसएम इंटर कॉलेज बागपतच्या अनुराग मलिकने 97 टक्के मार्क्स घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. एसपी इंटर कॉलेज, शिकरो प्रयागराजच्या प्रांजल सिंह हिने 96% गुणांसह दुसरा तर श्रीगोपाल इंटर कॉलेज औरैयाच्या उत्कर्ष शुक्लाने 94.80 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

या वेबसाइट्सवर पाहा रिझल्ट :


रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिशिअल वेबसाइटवर आपला सात अंकी रोल नंबर आणि शाळेचा क्रमांक टाकावा लागेल. उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावीचे रिझल्ट पाहण्यासाठी खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता.


www.upmsp.edu.in

www.upmsp.nic.in


www.upresults.nic.in

www.upmspresults.up.nic.in.

ABP Newsच्या वेबसाइटवरही तुम्ही रिझल्ट पाहू शकता :


उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त विद्यार्थी ABP Newsच्या वेबसाइटवरही विद्यार्थी रिझल्ट पाहू शकणार आहेत. त्यासाठी इयत्ता दहावीचे विद्यार्थी up10.abplive.com. आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थी up12.abplive.com या संकेतस्थाळावर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


यूपी बोर्डाचा दहावी,बारावीचा निकाल घोषित, इथं पाहू शकता रिझल्ट