UP Board 10th & 12th Result 2020 | उत्तर प्रदेश बोर्ड (UPMSP) च्या इयत्ता दहावी आणि बारावीचे रिझल्ट आज म्हणजेच, 27 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. हे रिझल्ट उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा दुपारी साडेबाराच्या सुमारास बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करतील. युपी बोर्डाला विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे आशियातील पहिल्या क्रमांकाचं सर्वात मोठं बोर्ड असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच हे बोर्ड 99 वर्षांहून अधिक जुनं आहे. रिझल्ट जाहीर झाल्यानंतर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपला रिझल्ट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात. याव्यतिरिक्त ABP Newsच्या वेबसाइटवरही विद्यार्थी रिझल्ट पाहू शकता.
दरम्यान, उत्तर प्रदेश बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 06 मार्चमध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांसाठी दहावी आणि बारावी इयत्तेतील 56 लाख 11 हजार 072 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ज्यामध्ये हायस्कून परीक्षेसाठी 3022607 आणि इंटरमीडिएट परीक्षेसाठी 2584511 विद्यार्थी बसले होते.
गेल्या वर्षी (2019) बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी एकूण 72.83 टक्के विद्यार्थी पास झाले होते. मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली होती. या परीक्षेला बसलेल्या एकूण मुलींपैकी 78.44 टक्के मुली पास झाल्या होत्या. तर एकूण 67.36 टक्के विद्यार्थी पास झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा युपी बोर्डाचा रिझल्ट लॉकडाऊनमुळे एक महिना उशिराने जाहीर करण्यात येत आहे.
या वेबसाइट्सवर पाहा रिझल्ट :
रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफिशिअल वेबसाइटवर आपला सात अंकी रोल नंबर आणि शाळेचा क्रमांक टाकावा लागेल. उत्तर प्रदेश बोर्डाचे दहावीचे रिझल्ट पाहण्यासाठी खालील
वेबसाइट्सला भेट देऊ शकता.
www.upmsp.nic.in
www.upresults.nic.in
www.upmspresults.up.nic.in.
ABP Newsच्या वेबसाइटवरही तुम्ही रिझल्ट पाहू शकता :
उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त विद्यार्थी ABP Newsच्या वेबसाइटवरही विद्यार्थी रिझल्ट पाहू शकणार आहेत. त्यासाठी इयत्ता दहावीचे विद्यार्थी up10.abplive.com. आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थी up12.abplive.com या संकेतस्थाळावर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकतात.