News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

उत्तर प्रदेशात ‘योगी मँगो’, नव्या जातीच्या आंब्याला योगी आदित्यनाथांचं नाव

FOLLOW US: 
Share:
लखनौ: मोदी मँगोनंतर उत्तरप्रदेशात आता ‘योगी मँगो’ तयार झाला आहे. उत्तर प्रदेशातले मँगो मॅन हाजी कलीमुल्ली यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत नव्या जातीच्या आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. या आंब्याचं नाव त्यांनी योगी मँगो असं ठेवलं आहे. करेला आणि दशेरी आंब्यांच्या वैशिष्ट्यांनी बनलेला हा आंबा बारीक आणि लांब आहे. ही जात स्वतःच विकसित झाली असून जेव्हा लोकांनी तो पाहिला तेव्हा अनेकांनी त्याला योगी आदित्यनाथांचे नाव देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे नाव देण्यात आलं आहे. कलीमुल्ला यांच्याकडे ऐश्वर्या आणि सचिन तेंडुलकरच्या नावाचेही आंबे आहेत. 74 वर्षीय कलीमुल्लाह यांची आमराई लखनौपासून 30 किमी दूर मलीहाबाद इथं आहे. आतापर्यंत त्यांनी इथं अनेक वेगवेगळ्या आंब्यांची लागवड केली आहे. कलीमुल्लाह हे देशात 'मँगोमॅन' नावानं ओळखले जातात. ते गेल्या 50 वर्षाहून अधिक आंब्यांची शेती करत आहे. तसेच आंब्यांच्या नवनव्या जातींचाही त्यांनी आजपर्यंत शोध लावला आहे. दरम्यान, कलीमुल्लाह यांना पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
Published at : 08 May 2017 08:29 AM (IST) Tags: mango name

आणखी महत्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं

दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष

मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु

130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार

टॉप न्यूज़

Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान

ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार

चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत