Unnao Rape Case : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवती तिचे नातेवाईकांवर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप असलेल्या भाजपच्या माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याची दिल्ली कोर्टाने मुक्तता केली आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवती तिचे नातेवाईक आणि वकिलांसह कोर्टात कारने जात असताना रायबरेलीमध्ये ट्रकसोबत जोरदार धडक होऊन अपघात झाला होता. या प्रकरणी प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसल्याचं सांगत दिल्लीच्या एव्हेन्यू कोर्टने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. 


न्यायालायाने सांगितलं की कुलदीप सिंह सेंगर आणि इतरांच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्ट होतं. पण हा एक सुनियोजित कट होता असं पीडितेच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं होतं. 


 




उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवती तिचे नातेवाईक आणि वकिलांसह कोर्टात कारने जात असताना रायबरेलीमध्ये ट्रकसोबत जोरदार धडक होऊन अपघात झाला होता. यामध्ये पीडित मुलीची मावशी आणि काकींसह कारचालकाचा मृत्यू झाला होता. या अपघातात पीडित युवती आणि वकील महेंद्र सिंह गंभीर जखमी झाले होते. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा यापूर्वीच संशयित मृत्यू झाला होता. या अपघातात ज्या ट्रकने कारला धडक दिली होती त्या ट्रकच्या नंबर प्लेटशी छेडछाड करण्यात आली होती. नंतर पोलिसांनी तपास करुन आरोपींना अटक केली होती. 


उन्नाव जिल्ह्यातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात माजी आमदार कुलदीप सेंगर आणि त्याचा सहकारी शशी सिंह विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गात गुन्ह्याची नोंद केली होती. या प्रकरणी हे दोघे दोषी ठरवल्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने 20 डिसेंबर 2019 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सेंगरला शिक्षा झाली त्यावेळी तो उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ भागातील भारतीय जनता पक्षाचे आमदार होतै आणि शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.


महत्त्वाच्या बातम्या :