नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी असलेल्या आणि भाजपमधून निलंबित झालेल्या आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्याला 25 लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे. शिक्षा सुनावताना कोर्टाने म्हटले आहे की, 25 लाख रुपयांमधील 10 लाख रुपये पीडितेच्या कुटुंबियांना दिले जावे, तसेच उर्वरीत 15 लाख रुपये सरकारला द्यावे.
2017 मध्ये एका तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सिंह सेंगरवर होता. 16 डिसेंबरच्या सुनावणीवेळी तो गुन्हा सिद्ध झाला. उत्तर प्रदेशच्या बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सेंगरची भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी केली आहे.
कोर्टाने 9 ऑगस्ट रोजी कुलदीप सेंगर आणि त्याचा सहकारी शशी सिंह विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गात गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज त्याची सुनावणी झाली.
उन्नाव पीडितेची हृदयद्रावक कहाणी; न्यायासाठी जाताना घात
नेमकं घडलं काय?
उन्नावपासून 50 किलोमीटर अंतरावर हिंदूपूर गाव आहे. गावात मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी आणि पीडित मुलगी अर्ध्या किलोमीटर अंतरावर राहतात. दोन्ही कुटुंबाचे दोन वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत जवळचे संबंध होते. बऱ्याचदा पीडित मुलीच्या कुटुंबाला मदतही केली होती. शिवम आणि पीडित मुलीची हळूहळू मैत्री वाढली आणि दोघं प्रेमात पडले. पीडितेच्या कुटुंबाच्या दाव्यानुसार दोघांनी कोर्टात नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. अर्थात ही बाब कुटुंबाला माहिती नव्हती. काही दिवसांनी शिवम त्रिवेदीनं विवाह केल्याचं मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणं झाली, शिवमच्या कुटुंबानं पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलंही होतं.
पोलीसांनी लवकर तक्रार घेतली नसल्याचा आरोप
ही घटना घडल्यानंतर पीडितेने न्यायासाठी पोलीसांकडे धाव घेतली. मात्र, पोलीसांनी ठाण्याच्या फेऱ्या मारायला लावल्याचा आरोप पीडीतेच्या कुटुंबांकडून करण्यात आला आहे. पोलीसांनी हात वर केल्याने पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आरोपींच्या विरोधात केस दाखल झाल्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबाला धकम्या येऊ लागल्या. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एका आरोपीला 10 दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, 5 डिसेंबरला पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात होती. याच केसच्या संदर्भात पीडिता सकाळी कोर्टात जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली.
काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं?
भय इथले संपत नाही | महिला सुरक्षेबाबत महाचर्चा | नागपूर | ABP Majha