बुडगाम : पुलवामामधील हल्ल्यातील शहीद जवानांच्या पार्थिवांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खांदा दिला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची पार्थिवं बुडगाम या ठिकाणी आणण्यात आली. त्यावेळी देशाचे गृहमंत्री आणि जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंगही या दोघांनी जवानांच्या पार्थिवांना खांदा दिला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरात सीआरपीएफच्या गाडीला अतिरेक्यांच्या विस्फोटपुलवामा गुरुवारी दहशतवादी हल्ल्याने हादरलं. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान शहीद जवानांची पार्थिवं पाहून अवघा देश हळहळला आहे.


पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून निषेध होत आहे. या हल्ल्यात शहीद जवानांची पार्थिवं ज्यावेळी आणण्यात आली तेव्हा सगळा देश हळहळला. या जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला, त्याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी या पार्थिवांना खांदा दिला.


या हल्ल्याप्रकरणी आवश्यक ती संपूर्ण कारवाई केली जाईल, या कारवाईत कोणतीही कसूर केली जाणार नाही, असे या हल्ल्याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह  काल म्हणाले होते.  हा हल्ला पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने केला आहे. मी आणि संपूर्ण देश याचा निषेध करतो. या दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. मी जनतेला आश्वस्त करु इच्छितो की, याप्रकरणी जी काही कारवाई केली जाईल, त्यामध्ये थोडीदेखील कसूर केली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. पुढील कारवाई कुठे करावी, त्याची वेळ काय असणार आणि ठिकाण कोणते असेल, त्याचे स्वरुप काय असेल, हे ठरवण्याची जबाबदारी आम्ही सैन्याकडेच सोपवली आहे, असे मोदींनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका, असे त्यांनी म्हटले आहे. शांत बसणे मर्दानगी नव्हे. या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोकं आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे, सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

काय झालं पुलवामात?


जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


संबधित बातम्या


पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला


पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?


Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य


Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीद