नवी दिल्ली : जम्‍मू काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर, देशभरात संतापाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे सीआरपीएफनेही आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही, जवानांचं बलिदान व्यर्थ होणार नाही. तर हल्ला करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे, असं सीआरपीएफने म्हटलं आहे.

सीआरपीएफने हल्ल्याबाबत ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये सीआरपीएफमध्ये लिहिलं आहे की, "त्यांनी आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आमचं अभिवादन आणि आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. या घृणास्पद हल्ल्याचा बदला घेणारच."


दुसरीकडे पुलवामातील हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी जोर धरु लागली आहे. शहीदांच्या कुटुंबीयांनी ही पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, बदला घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सैन्याला दिल्याचं म्हटलं आहे.

VIDEO | केंद्रीय सुरक्षा समितीची महत्वपूर्ण बैठक सुरु | एबीपी माझा


काय झालं पुलवामात?


जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 39 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


संबधित बातम्या


पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला


पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?


Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य


Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीद