नवी दिल्ली: एनडीएकडून उपराष्ट्रपती पदी व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणींकडे सोपवण्यात आली आहे. तर नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी नरेंद्र तोमर यांच्याकडे दण्यात आली आहे.

स्मृती इराणी यांच्याकडे सध्या वस्त्रोद्योग मंत्रालय आहे. तर नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा कारभार आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतीपदी उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू यांची घोषणा झाल्यानंतर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही दिवसात कॅबिनेटचा विस्तार होऊ शकतो.


व्यंकय्या नायडू यांच्याकडील दोन्ही खाती महत्त्वाची असल्यानं यासाठी पूर्णवेळ मंत्र्यांची गरज आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटलींकडे हे खातं सोपवण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाला देखील पूर्णवेळ मंत्री अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे लवकरच कॅबिनेटचा विस्तार होऊ शकतो अशी राजधानीत चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या:

व्यंकय्या नायडू यांना एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

पोस्टर चिपकवणारा कार्यकर्ता ते उपराष्ट्रपतीपदाचे उमदेवार!