नवी दिल्ली : देशातील कोरोना रूग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्री मंडळातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. केंद्रीय जल संसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह आला आहे. मंत्री शेखावत यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

गजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्विटर वर लिहलंय, ''अस्वस्थता आणि काही लक्षण दिसल्याने मी कोरोना टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती झालो आहे. माझी विनंती आहे, की मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन कोरोना चाचणी करुन घ्यावी. तुम्ही सर्वजण स्वस्थ आणि आपली काळजी घ्या"

धोनीच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदीही भावूक; पत्र लिहून भावना व्यक्त

जल संसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

राजस्थान मध्ये जन्मलेले गजेंद्र सिंह शेखावत मोदी सरकारच्या मंत्री मंडळात जल संसाधन मंत्री आहेत. 30 मे, 2019 ला मोदी सरकारने शेखावत यांना जल संधारण, नदी विकास आणि गंगा कायापलट मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली. या अगोदर मोदी सरकारच्या कार्यकाळात 3 सप्टेंबर 2017 ला शेखावत यांनी केंद्रीय राज्य मंत्री, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली होती.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 69652 नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 69652 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 977 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,36,926 वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये 6,86,395 अॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत देशातील 20,96,665 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 53,866 जणांचा कोरोने बळी घेतला आहे.

Swachh Survekshan 2020: देशात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई तिसऱ्या स्थानी, इंदूर पहिल्या स्थानी