Covid Vaccine Guidelines: देशात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच लसीकरण सुरू करत असल्याची घोषणा केलीय. येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केलीय. त्यानुसार प्रसुतीगृह आणि महापालिकेची 350 लसीकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असेल. 


आरोग्य मंत्रालायानं नुकतीच लहान मुलांचं लसीकरण (वय 15-18), आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीय. 


- येत्या तीन जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.


- आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी ज्यांनी कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना आणखी एक डोस दिला जाणार जाईल.


- कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत, त्यांनाच तिसरा डोस दिला जाणार आहे.


ट्वीट-



ट्वीट-  



लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आलंय. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअॅक्शन झालं तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन झाली नसल्याची माहिती आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha