Nirmala Sitharaman Health Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (Aiims Hospital, Delhi) दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यांना दुपारी 1 वाजता दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिली जात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत एम्सचे डॉक्टर (Aiims Hospital, Delhi) लवकरच एक निवेदन जारी करतील. पोटदुखीमुळे (Stomach Infection) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजत आहे. एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आवश्यक टेस्ट करण्यात आल्या आहेत.











तत्पूर्वी, सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी चेन्नईतील डॉ. एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या 35 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली होती. तसेच सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रविवारी नवी दिल्लीतील 'सदैव अटल' (Sadaiv Atal) येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Former Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली वाहिली.


'भारत महागाई रोखण्यात सक्षम'


दरम्यान, सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकताच भारत महागाई रोखण्यात सक्षम असल्याचा दावा केला होता. त्या म्हणाल्या  (Nirmala Sitharaman) होत्या की, अन्नधान्याच्या किमतींवरील पुरवठ्यावरील दबाव नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याचा परिणामही दिसून आला आहे. नोव्हेंबरमधील महागाईचा दर (India Inflation Rate 2022) यंदा प्रथमच 6 टक्क्यांच्या खाली आला आहे. तज्ज्ञांच्या मते 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Central Budget ) अत्यंत महत्त्वाचा असेल. याचे कारण म्हणजे 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024) सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Ekikaran Samiti Agitation : रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल में! कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार