Union Budget 2023-24: लोकसभेत (Lok Sabha) शुक्रवारी (10 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Union Budget 2023-24) वरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे खासदार मोदी सरकारवर (Modi Government) भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. यावर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना संताप अनावर झाला. त्या म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी 'डेटॉल'नं तोंड धुवून यावं. 


काँग्रेस भ्रष्टाचारावर बोलतंय? 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "तुम्ही (काँग्रेस) भ्रष्टाचारावर बोलत आहात? सीतारमण बिगर भाजप शासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींबाबत बोलत होत्या. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांनी हिमाचल सरकारला विचारावं की, त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच डिझेलवर 3 रुपयांनी व्हॅट का वाढवला?"


पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ 


पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांवरही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाष्य केलं. सीतारमण म्हणाल्या की, फेब्रुवारी 2023 मध्ये पंजाब सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 90 पैशांची वाढ केली. या किमती कमी होत नाही. केरळमध्येही त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील सेस 2 रुपयांनी वाढवला. सीतारमण म्हणाल्या की, काही राज्यांनी थोडे पैसे कमी केले आहेत, तर अजुनही अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर पैसे कमी केलेले नाहीत.


'या' राज्यांनी किमती कमी केलेल्या नाहीत


अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पश्चिम बंगालनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत, तामिळनाडूनं काही किमती कमी केल्यात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंडनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत. अन्न आणि खतांच्या अनुदानात कपात केल्याचा विरोधकांचा आरोप सीतारमण यांनी फेटाळून लावला. फर्टिलायझर  आयातीचा अतिरिक्त खर्च याआधीही शेतकऱ्यांवर लादण्यात आला नाही. या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांवर बोजा टाकला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.


राजस्थानमध्ये सर्वकाही गडबड : निर्मला सीतारमण 


अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या सरकारनं नोव्हेंबर 2021 आणि जून 2022 मध्ये दोनदा पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून लोकांना दिलासा दिला आहे. तसेच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल (शुक्रवारी) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना गेल्या वर्षीचा जुनाच अर्थसंकल्प सादर केला. यावरुनही निर्मला सीतारमण यांनी अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. काहीतरी गडबड सुरू आहे, असं म्हणत निर्मला सीतारमण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थान सरकारवर निशाणा साधला आहे.