नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. जेटलींनी म्हणजेच मोदी सरकारने 'आवळा देऊन कोहळा काढला' असाच अर्थसंकल्पातून दिसून येतंय. कारण टॅक्स स्लॅब अर्थात कररचनेत कोणतेही बदल झालेले नाहीत. शिवाय शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी कराल, त्या त्या बिलावर 1 टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता, तो आता 4 टक्के असेल. या अर्थसंकल्पातील दिलासादायक बाब म्हणजे, शेती आणि आरोग्य क्षेत्राला तुलनेने भरीव तरतूद केली आहे. येत्या खरीपापासून शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. तर गरीब कुटुंबाना दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत उपचाराची सोय करण्यात आली आहे. अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्याने विदेशी वस्तू महागल्या आहेत. महाग-
  • मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज
  • टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू
  • फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस
  • परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज
  • टूथपेस्ट, टूथ पावडर
  • सौंदर्यप्रसाधने
  • कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज
  • ट्रक आणि बसचे टायर
  • चप्पल आणि बूट
  • सिल्क कपडा
  • इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड
  • फर्निचर
  • घड्याळं
  • एलसीडी, एलईडी टिव्ही
  • दिवे
  • खेळणी, व्हीडीओ गेम
  • क्रीडा साहित्य
  • मासेमारी जाळं
  • मेणबत्त्या
  • गॉगल
  • खाद्यतेल
  • टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू
  • शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार
स्वस्त-
  • कच्चा काजू
  • पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त (एक्साईज ड्युटी कमी)
  • आयात कर वाढवल्याने भारतातील वस्तू स्वस्त होतील, मागणी वाढेल