मुंबई: मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यामध्ये महत्वपूर्ण ठरलेल्या, विशेष असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जगभरातील ठिकाणांचे संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. यूनेस्कोकडून हा कार्यक्रम राबवला जात असून यामध्ये भारतातील एकूण 40 ठिकाणांचा समावेश आहे.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या भारतातील ठिकाणांची तीन विभागात विभागणी होते. यामध्ये नैसर्गिक विभागात 32, सांस्कृतिक विभागात 7 तर मिक्स विभागात एका ठिकाणाचा समावेश होतो. त्याची यादी खालीलप्रमाणे
नैसर्गिक विभागातील जागतिक वारसा स्थळं
- काझिरंगा नॅशनल पार्क- आसाम 1985
- केवलागदेव-घाना नॅशनल पार्क- राजस्थान 1985
- मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी- आसाम, 1985
- नंदा देवी नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स- उत्तराखंड, 1988,2005
- सुंदरबन नॅशनल पार्क- पश्चिम बंगाल, 1987
- पश्चिम घाट- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, 2012
- ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क- हिमाचल प्रदेश, 2014
सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी
- ताजमहल- उत्तर प्रदेश, 1983
- वेरुळ लेण्या- महाराष्ट्र, 1983
- अजंठा लेण्या- महाराष्ट्र 1983
- आग्रा किल्ला- उत्तर प्रदेश, 1983
- सूर्य मंदिर कोणार्क- ओडिशा- 1984
- महाबलीपूरम- 1984
- खजुराहो लेण्या- मध्य प्रदेश- 1986
- फत्तेपूर सिक्री- उत्तर प्रदेश, 1986
- गोव्यातील चर्चेस- गोवा, 1986
- पट्टदकलमधील मंदिरे- कर्नाटक, 1987
- चोल राजांची मंदिरे- तमिळनाडू, 1987
- एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी- महाराष्ट्र, 1987
- सांची स्तूप- मध्य प्रदेश, 1989
- कुतुब मिनार- दिल्ली, 1993
- हुमायूनची कबर- दिल्ली, 1993
- भारतातील पर्वतीय रेल्वे- निलगिरी, तामिळनाडू, 1999
- महाबोधी मंदिर- बोध गया, बिहार, 2002
- भीमबेटका- मध्य प्रदेश, 2003
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई, महाराष्ट्र, 2004
- चंपानेर-पावागढ उद्यान- गुजरात, 2004
- लाल किल्ला- दिल्ली, 2007
- राणी की बाव- गुजरात, 2014
- नालंदा विश्वविद्यालय (महाविहार)- बिहार, 2016
- जयपूर पिंक सिटी- राजस्थान, 2020
- अहमदाबाद- गुजरात, 2017
- व्हिक्टोरियन अॅन्ड आर्ट डेको एन्सेम्बल- मुंबई, महाराष्ट्र, 2018
- चंदीगड शहर- चंदीगड, 2016
- काकतिया मंदिर (रामप्पा) मंदिर- तेलंगना, 2021
- ढोलविरा- गुजरात, 2021
मिश्र विभागातील स्थळ
- कांचनगंगा नॅशनल पार्क- सिक्किम, 2016
महत्वाच्या बातम्या: