Boris Johnson India Tour : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कालपासून भारत दौऱ्यावर आहेत. जॉन्सन यांनी काल गुजरातमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यांनी काल अहमदाबादमध्ये उद्योजकांसोबत चर्चा केली. भारताची स्वतःची लढाऊ विमाने तयार करण्यासाठी ब्रिटन करणार भारताला मदत करणार असल्याबाबत सुतोवाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. आज ते पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. ब्रिटन भारताला स्वत:ची लढाऊ विमाने कशी बनवायची आणि संरक्षण उपकरणांच्या जलद वितरणासाठी परवाना देणार असल्याची माहिती आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर याबाबत अजून जास्त स्पष्टता येईल.
बोरिस जॉन्सन आज रशियाकडून अर्ध्याहून अधिक लष्करी उपकरणे खरेदी करणाऱ्या दक्षिण आशियाई देशांसोबत व्यापार आणि सुरक्षा संबंध वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. जगाला निरंकुश राष्ट्रांकडून वाढत्या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. जे लोकशाहीला कमजोर करू पाहत आहेत. मुक्त आणि निष्पक्ष व्यापार बंद करत ही राष्ट्रं सार्वभौमत्व पायदळी तुडवतात, असे जॉन्सन यांनी काल एका निवेदनात म्हटलं आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नवीन भारतीय-डिझाइन केलेल्या आणि तयार केलेल्या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी पाठिंबा देण्यासाठी आणि विमाने बनवण्याबाबतचे सर्वोत्तम सुविधा देण्यावर आज चर्चा होणं अपेक्षित आहे.
ब्रिटन संरक्षण वस्तूंच्या वितरणाची वेळ कमी करण्यासाठी भारताला तथाकथित मुक्त सामान्य निर्यात परवाना जारी करण्याची शक्यता आहे. माहितीनुसार सध्या फक्त युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्सकडे असा परवाना आहे.
हवामान बदलापासून ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण अशा विषयांवर आज पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर; 'या' मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला दणका? पूल उडवून रशियन सैन्याचा ताफा नष्ट केल्याचा दावा