Aadhaar Card Update : देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) सरकारने मोठा दिलासा दिला आहे. UIDAI ने सांगितलं की, आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. UIDAI ने आधार अपडेट करण्याचं शुल्क रद्द केलं आहे. पण, यासाठी एक अट आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तेच जर तुम्ही आधार कार्ड फिजिकल काऊंटरवर अपडेट केलं तर त्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागतील. 


केव्हा उपलब्ध होणार सुविधा? 


UIDAI नं सांगितलं की, आधार धारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येईल. आधार कार्ड धारक 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत त्यांचं आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकतात.


31 मार्चपर्यंत पॅन, आधार लिंक करणं अनिवार्य 


महत्त्वाची बाब म्हणजे, आधार-पॅन कार्ड लिंक (Aadhaar- Pan Card Link) करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. यासोबतच, ज्यांनी 10 वर्षांपासून आधारमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करुन घ्यावं, यासाठी UIDAI प्राधिकरण सातत्याने माहिती देत आहे. 






आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी काय कराल? 


आधार कार्ड धारक त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करु शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. यानंतर तुम्हाला 'Document Update' वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला तुमचा तपशील दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमची अपडेटेड माहिती भरावी लागेल. 


आधार पत्ता ऑनलाईन अपडेट करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा 


 1. https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेत स्थळावर तुम्ही स्वत: अपडेट करु शकता. आधार स्वयं-सेवा (Self Service) अपडेट पोर्टलवर जा आणि 'पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा' (proceed to update address) पर्यायावर क्लिक करा.
 2. आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP वापरुन लॉग इन करा.
 3. 'proceed to update address ' वर क्लिक करा.
 4. 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा.
 5. OTP एंटर करा आणि आधार खात्यात लॉगिन करा.
 6. 'update address via address proof' पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता भरा. 
 7. 'Proof of Address' मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता भरा.
 8. आता, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट बटणावर क्लिक करा.
 9. पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.


ऑफलाईन पद्धतीने कसं अपडेट कराल आधार कार्ड? 


तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला ठराविक शुल्क भरुन आधार अपडेट करावं लागेल. आधार अपडेट करायला जाताना फोटो आईडी घेऊन जावं लागेल.