Uber Cab: देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. यामुळे कॅब सेवेचे दर वाढवावेत, अशी मागणी उबेर आणि ओलाचे चालक सातत्याने करत आहेत. आता उबर कंपनीने ही मागणी मान्य केली असून दर 12 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.


याबाबत माहिती देताना UBER चे दक्षिण आशिया आणि भारत प्रमुख नितीश भूषण यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या चालकांची चिंता समजतो. तेलाच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ते चिंतेत आहेत. आमच्या ड्रायव्हर्सना मदत करण्यासाठी, आम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये ट्रिपची किंमत 12 टक्क्यांनी वाढवत आहोत. आम्ही पुढील काळात तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवू आणि गरज पडल्यास आणखी निर्णय घेऊ. आता ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांचे चालक संपावर गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


चलांकाच्या संपानंतर उबेरने एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या वतीने किमती 12 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत आता उबरमध्ये प्रवास करताना प्रवाशांना 12 टक्के जास्त भाडे मोजावे लागणार आहे. याचा मोठा फटका उबेर सेवा घेणाऱ्यांना बसणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha