Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मोहम्मद शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला दहशतवादमुक्त क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य हवे आहे. जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि आमच्या लोकांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करू शकू." शाहबाज यांनी सोमवारी रात्री 10 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी परराष्ट्र धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी नॅशनल असेंब्लीला सांगितले की, मला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. परंतु, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय ते साध्य होऊ शकत नाहीत.
शाहबाज शरीफ म्हणाले की, "सौदी अरेबियानं अशावेळी आमचं समर्थन केलं होतं, ज्यावेळी बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली जात होती. त्यावेळी सौदी अरेबियानं पाकिस्तानला पाठिंबा दिला. काश्मीर प्रश्न हा सौदी अरेबियाशिवाय सोडवला जाऊ शकत नाही."
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या बाजूने संसदेत 174 मते पडली. यादरम्यान अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाचा एकही खासदार सभागृहात उपस्थित नव्हता. 342 सदस्यांच्या सभागृहात विजयासाठी किमान 172 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
- Lata Mangeshkar Award : पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर