काश्मीरमध्ये CRPF च्या ट्रकवर दगडफेक, दोन जवानांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2018 11:42 PM (IST)
दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग परिसरात दंगलखोरांनी CRPF च्या ट्रकला लक्ष्य केलं. दंगलखोरांच्या दगडफेकीत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. तर दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.
प्रातिनिधिक फोटो
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग परिसरात दंगलखोरांनी CRPF च्या ट्रकला लक्ष्य केलं. दंगलखोरांच्या दगडफेकीत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. तर दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, CRPF चे जवान कोकेरनाग परिसरात गस्त घालत होते. यानंतर ते आपल्या कॅम्पवर परतत असताना, दंगलखोरांनी ट्रकवर तुफान दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत ट्रकचालक रुप सिंह गंभीर जखमी झाला. त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन मोटारसायकवरुन येणाऱ्या दोन जवानांना चिरडले. दोन्ही जवांनाना रुग्णालायात दाखल करण्यात आलं. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तर ट्रकचालक रुप सिंहवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.