Twitter Blue Tick Paid in India : ट्विटरची ( Twitter ) मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडे आल्यावर त्यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठी ( Twitter Blue Tick ) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंटना ( Verifued User Account ) मिळणाऱ्या ब्लू टिकसाठी युजर्सला पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी दरमहा आठ डॉलर्स शुल्क आकारलं जाणार असल्याचं माहिती मस्क यांनी दिली होती. त्यामुळे आता ट्विटरवर सबस्क्रिप्शन मॉडेल ( Twitter Subscripton ) राबवण्यात येणार आहे. भारतातही लवकरच ट्विटरची पेड सर्व्हिस सुरु होणार आहे. भारतात ब्लू टिकची पेड सर्व्हिस कधीपासून सुरु होणार याबाबत मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


भारतीय यूजरने मस्क यांना विचारला प्रश्न


एका भारतीय युजरने ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांना विचारलं की, भारतात ब्लू टिकसाठीची सशुल्क सेवा म्हणजे पेड सर्व्हिस केव्हापासून सुरु होणार आहे. यावर उत्तर देत मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटरवर एक वेरिफाइड भारतीय यूजर @Cricprabhu याने एलॉन मस्क यांना प्रश्न विचारत पोस्ट केलं की, 'भारतात ट्विटर अकाऊंटवर ब्लू टिकसाठी पेड सर्व्हिस कधी सुरू होईल?' यावर मस्क यांनी यावर उत्तर देत म्हटलं आहे की, 'एका महिन्याच्या आत'. भारतात या महिन्याच्या शेवटपर्यंत ट्विटरची पेड सर्व्हिस सुरु होण्याची शक्यता आहे.






पाच देशांमध्ये ट्विटरची सशुल्क सेवा सुरू


ट्विटरने प्रति महिना आठ डॉलर दराने सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. पेड सर्व्हिस सुरु करणार असल्याची माहिती ट्विटरने आधीच दिली होती. सध्या ट्विटर पेड सर्व्हिस अमेरिकी, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. ब्लू टिकसाठी पेड सबस्क्रिप्शनमध्ये युजर्सना आठ डॉलर आकारण्यात येत आहेत. या सबस्क्रिप्शनमध्ये युजर्सना अनेक नवीन फीचर्सचा लाभही मिळणार आहे.






भारतीयांसाठी 10 डॉलर शुल्क


ट्विटरवरील ब्लू टीकसाठी आठ डॉलर्स शुल्क आकारण्यात येण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली होती. वेगवेगळ्या देशांच्या चलनाप्रमाणे या शुल्कात बदल होईल, असंही सांगण्यात आलं होतं. भारतीयाना ब्लू टीकसाठी दरमहा 8 डॉलर आणि त्यावरील जीएसटी मिळून एकूण 10 डॉलर शुल्क आकारण्यात येणार आहे. 10 डॉलर म्हणजे भारतीय 819 रुपये. पण 10 डॉलरचं मूल्य यावरून नाही तर परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार (Purchasing Power Parity) ठरणार आहे. 


काय आहे परचेजिंग पॉवर पॅरिटी? ( PPP - Purchasing Power Parity)


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) अनुसार, परचेजिंग पावर पॅरिटी असा दर आहे जो एका देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात रूपांतरित करून समान प्रमाणात वस्तू आणि सेवा खरेदी करता येऊ शकतात. ओईसीडीनुसार (Organisation for Economic Co-operation and Development) परचेजिंग पॉवर पॅरिटी करेन्सी कन्‍वर्जनप्रमाणे दर ठरवला जातो. याद्वारे वेगवेगळ्या चलनांची खरेदी एकसमान केली जाते. या कन्‍वर्जनमध्ये वेगवेगळ्या देशांची किंमतीमधील फरकाला सामाविष्ट केले जात नाही. 


भारतीयांनी ब्लू टिकसाठी दरमहा 231 रुपये शुल्क


परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार 1 डॉलरचं मूल्‍य 81.98 रुपये होत नाही. परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार वेगवेगळ्या चलनांची खरेदी एकसमान केली जाते. या पद्धतीनं भारताच्या परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 8 डॉलरचे 660 रुपये ( 8 Dollar - 185.11 INR PPP ) होत नाही. ब्लू टिकसाठी 185 रुपये मोजावे लागत आहे. भारतीयांना यासाठी 10 डॉलर म्हणजे दरमहा 231 रुपये शुल्क ( 10 Dollar - 231.38 INR PPP ) भरावे लागेल.