Telangana Rashtra Samithi : नुकतेच महाराष्ट्रात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' (Operation Lotus) यशस्वी झाले आहे. त्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा तेलंगणा राज्यात वळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. तेलगंणात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. कारण तेलंगणा राष्ट्र समितीचे (Telangana Rashtra Samithi) 15 ते 18 आमदार भाजपच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती तेलंगणातील भाजपचे नेते एन व्ही सुभाष यांनी दिली आहे. तसेच काँग्रेसच्या पाच आमदारानी देखील भाजपमध्ये जाण्याची संमती दर्शवली असल्याची माहिती सुभाष यांनी दिली आहे. 


महाराष्ट्र राज्यानंतर आता तेलंगणा राज्यातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण भाजपच्या नेत्यानं याबाबत मोठं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे जवळपास 15 ते 18 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्यानं दिल्यानं तेलंगणात खळबळ उडाली आहे. भाजपचे आता तेलंगणात 'ऑपरेशन लोटस' सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. 


 






नेमकं काय म्हणालेत एन व्ही सुभाष


तेलंगणा राष्ट्र समितीचे 15 ते 18 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच काँग्रेसच्या पाच आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्यास संमती दर्शवली आहे. तेलंगणातील लोकांना विश्वास आहे की भाजप त्यांच्या आकांक्षा पूर्ण करेल आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एन व्ही सुभाष यांनी दिली आहे.


महाराष्ट्रातील बंड


ज्या ठिकाणी भाजपेत्तर पक्षाचे सरकार सत्तेत आहे तिथे 'ऑपरेशन लोटस' च्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. यामुळं कॉंग्रेसला मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटकात सत्ता गमवावी लागली. परंतू, भाजपला राजस्थान, महाराष्ट्र राज्यात तोंडघशी पडावे लागले होते. मात्र, महाराष्ट्रात भाजपने अखेर 'ऑपरेशन लोटस' यशस्वी केलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधीच बंड केलं. त्यांनी तब्बल शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यान शिंदे सरकार स्थापन झालं. यामध्ये एकनाश शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा तेलंगणा राज्यात वळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: