कोर्ट रुममध्ये काय झालं?
सकाळी 10.30 वा. सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकवर सुनावणी सुरु
सुप्रीम कोर्टाच्या खोली नंबर 1 मध्ये पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपला निर्णय देण्यास सुरुवात केली
सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी सर्वात आधी आपला निर्णय वाचणं सुरु केलं. त्यांनी जवळपास 10 मिनिटे आपला निर्णय वाचला. सरन्यायाधीश खेहर म्हणाले, तिहेरी तलाक घटनाबाह्य नाही. तिहेरी तलाक कोणत्याहीप्रकारे कलम 14,15, आणि 21 चं उल्लंघन करत नाही.
न्यायमूर्ती खेहर यांच्यानंतर अन्य न्यायमूर्तींनी आपला निर्णय वाचण्यास सुरुवात केली.
न्यायमूर्ती आर एफ नरिमन, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती यू यू ललित यांनी तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचं नमूद केलं.
मात्र खेहर यांच्याप्रमाणे न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांनीही तिहेरी तलाकच्या बाजूने निर्णय दिला.
त्यामुळे तीन विरुद्ध दोन अशा निर्णयाने तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली.
या पाच न्यायाधीशांनी निर्णय दिला!
- सरन्यायाधीश जे एस खेहर (शीख)
- न्यायमूर्ती कुरियन जोसेफ (ख्रिश्चन)
- न्यायमूर्ती आर एफ नरिमन (पारसी)
- न्यायमूर्ती यू यू ललित (हिंदू)
- न्यायमूर्ती अब्दुल नझीर (मुस्लिम)
संबंधित बातम्या
तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट
Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो