Belgaum News : मेसोपोटेमिया येथे (आत्ताचे इराक) 1918 मध्ये युध्दात अतुलनीय शौर्य गाजवून शहीद झालेल्या 114 मराठा बटालियनच्या सैनिकांना मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे शरकत दिन कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. 29 ऑक्टोबर 1918 मध्ये झालेल्या युध्दात आपल्या रक्ताने इतिहास लिहून शौर्य आणि त्यागाचे दर्शन घडवलेल्या 114 मराठाला शरकत हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता.


मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे झालेल्या शरकत दिन कार्यक्रमात कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी शरकत युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून 114 मराठा बटालियनच्या सैनिकांना आदरांजली वाहिली. शरकत दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सैनिक संमेलन आयोजित केले होते. सैनिक संमेलनाला अधिकारी,सैनिक, नागरी  कर्मचारी शरकत दिन कार्यक्रमाला उपस्थित होते.


या युध्दात युनिटला दोन डिस्टिंगविशड सर्व्हिस ऑर्डर्स, चार मिलिटरी क्रॉस, सहा इंडीयन ऑर्डर ऑफ मेरिट, सोळा इंडीयन डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल आणि आठ मेंशन इन डिस्पॅचिस असे शौर्याचे पुरस्कार मिळाले. आजवर कोणत्याही युनिटला मिळालेले हे सर्वाधिक पुरस्कार आहेत. आजवर इतके पुरस्कार अन्य कोणालाही मिळाले नाहीत. आजवर हा विक्रम अबाधित आहे.


इतर महत्वाच्या बातम्या