नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी 22 मार्चला देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दिवशी देशभरात साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यात लोकल, पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. सोबतच यावेळेत लोकल आणि ट्रेन देखील अतिशय कमी प्रमाणात चालवण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश आहे. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्चला देशातील सर्व नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याची विनंती केली आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मोदींनी केली. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.

#JantaCurfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा

देशभरात साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे रद्द
जनता कर्फ्युच्या वेळी लोकल आणि इतर ट्रेन देखील अतिशय कमी प्रमाणात चालवण्याचा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. यावेळी लोकलच्या सर्व्हिस देखील अतिशय कमी मिळणार असल्याचे सांगण्यात आलंय. तर एक्सप्रेस गाड्या मोठ्या प्रमाणात कॅन्सल करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिलेत. 22 मार्चला देशभरात 2400 पेसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तर, 1300 मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस देखील याकाळात धावणार नाही. 22 तारखेला सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत सुरू होणाऱ्या सर्व गाड्या असणार बंद राहणार असल्याची माहिती बोर्डाने दिली. त्यामुळे मुंबईहुन पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा शहरांना जोडणाऱ्या इंटरसिटी गाड्या धावणार नाहीत. सोबत पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्या असणार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जे प्रवासी आधीच निघून प्रवासात आहेत, त्यांना स्टेशनवर थांबण्यास परवानगी आणि सुविधा देण्यात येणार आहे. ज्यांच्या तिकीट कॅन्सल होणार आहेत अशांना रिफंड मिळणार आहे. तर मोठ्या स्टेशनवर परिस्थिती बिकट वाटली तर स्पेशल ट्रेन चालवून गर्दी कमी करण्याची मुभा देखील असणार आहे.

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खाकी वर्दीची भावनिक साद

जनता कर्फ्यूवेळी करायचं काय?
रविवारी, 22 मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल असे मोदी म्हणाले. हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत. व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून 22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असं मोदी म्हणाले.

#JantaCurfew | रविवारी देशभरात जमता कर्फ्यू; देशवासियांना काय वाटतं?