बारामती : कोरोना व्हायरसने जगावर आणलेल्या आपत्तीतून बचाव करण्यासाठी अनेक अभिनेता-अभिनेत्री आता सोशल मीडियातून आवाहन करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती पोलीसही सरसावले आहेत. पहिल्यांदाच पोलिसांकडून सोशल मीडियाद्वारे आवाहन केलं जातंय. बारामतीचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पुढाकाराने हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. नागरिकांना घरात राहण्याचा आवाहन या व्हिडिओतून करण्यात आलंय. सोशल मीडियाद्वारे हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. व्हिडिओमध्ये "आम्ही आपल्यासाठी कर्तव्यावर आहोत, आपण देशासाठी कृपया घरी रहावे" अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलंय.


बारामती पोलिसांनी तयार केलेला 10 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय. यात काही पोलीस कर्मचारी "आम्ही आपल्यासाठी कर्तव्यावर आहोत, आपण देशासाठी कृपया घरी रहावे" अशा आशयाचे पोस्टर हातात धरले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी यासाठी राज्य सरकारकडून गर्दी टाळण्याचं आवाहन केल जात आहे. यासाठी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरं पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तरी काही ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असं आवाहन आता अनेकजण करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ केल्याचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.

Coronavirus | कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सक्षम, केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीस कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळणार
रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं आहे. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे 24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देण्यात येणार आहे.

Coronavirus | कोरोनावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना क्वारेन्टाइन करा : संजय राऊत

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 52
राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये आज आणखी तीन जणांची भर पडली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोनासंदर्भातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे या 52 पैकी पाच जण डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Coronavirus | Ajit Pawar PC | आवाहन करुनही गर्दी कमी न झाल्यास सार्वजनिक वाहतूक बंद करणार:अजित पवार