चेन्नई : महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरुन वाद सुरू असतानाच मराठी (Marathi) भाषेसाठी मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावरुन हिंदी भाषिकांना मारहाण होत असल्याचा आरोप परप्रांतीयाकडून होत आहे. त्यामुळे, मनसे विरुद्ध परप्रांतीय हा वाद पुन्हा उफाळून आल्याने प्रादेशिक भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच, आज सकाळी तामिळनाडूमधील कडलूर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताच्या (Accident) अनेक कारणांपैकी एक कारण हे प्रादेशिक भाषेचा असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, या रेल्वे (Railway) अपघातानंतर रेल्वे फाटक गेटवर ड्युटीसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. आता, डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी अपघाताच्या या घटनेला भाषेचं कारण जोडलं आहे. त्यामुळे, खरंच या अपघातासाठी भाषा हे कारण होते का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Continues below advertisement


तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील रेल्वे रुळावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. शाळेची बस रेल्वे रुळ ओलांडत होती समोरुन आलेल्या ट्रेनने जोरदार धडक दिल्याने बसचा चेंदामेंदा झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शाळेची बस रेल्वे रुळ ओलांडत असताना चालकाने समोरुन येणाऱ्या ट्रेनकडे दुर्लक्ष केलं आणि रुळ ओलांडला जाईल असा अंदाज बांधल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन भाषेचा मुद्दा समोर आणला आहे. 


कर्मचाऱ्यास तमिळ भाषेचं ज्ञान नव्हतं


डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी म्हटलं की, या ठिकाणी अगोदरही अपघाताची घटना घडली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वत:च सांगितलं की, येथील कर्मचाऱ्यास तमिळ भाषा येत नसल्याने हा अपघात झाला, असे एलंगोवन यांनी म्हटलं. कर्मचाऱ्यास जी कमांड देण्यात आली ती तमिळ भाषेत असल्याने त्यास समजली नाही. त्यामुळे, अशा जबाबदार आणि महत्त्वाच्या पदावर काम करणारी व्यक्ती स्थानिक भाषा समजणारी, बोलणारी असायला हवी. त्यामुळे, मदत होते आणि कमीत कमी लोकांचा जीव गेला असता, असे एलंगोवन यांनी म्हटलं आहे. 


रेल्वे फाटक खुलं असल्याने चालकाने बस पुढे नेकली


कडलूरमधील शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी 7.45 च्या सुमारास बस घेऊन चालली होती. तेव्हा येथील रेल्वे क्रॉसिंगचं गेट सुरु असल्याने ट्रेन येण्यापूर्वी आपली बस पुढे जाईल, असा अंदाज बस ड्रायव्हरने बाळगत बस पुढे नेली. मात्र, त्याचक्षणी भरधाव वेगात आलेल्या ट्रेनने बसला जोराची धडक दिली. त्यात, बस 50 मीटरपर्यंत फरफटत गेली, अनेक विद्यार्थी बसमधून खाली पडले, या दुर्घटनेट बसचा चेंदामेंदा झाला असून 3 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना कडलूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखळ करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोलीस व रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. 


हेही वाचा


मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण, पाकविरुद्धच्या कारवाईला समर्पित