Human Rights Commission News : शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना म्हणून एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने स्वतःलाचं औताला जुंपल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना लातूर जिल्ह्यातील हाडोळती या गावात घडली होती. दरम्यान, आता या घटनेची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून घेण्यात आली आहे. मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या न्यायपीठाकडून लातूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
लातूरमध्ये बैलाऐवजी स्वतःला औताला जुंपल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून घेण्यात आली आहे. मानवाधिकार आयोगाने अॅक्शन टेकन रिपोर्ट मागितला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंबादास गोविंद पवार हे लातूर (Latur) जिल्ह्यातील हाडोळती या गावातील शेतकरी आहेत. ते अडीच एकर कोरडवाहू शेतीचे मालक आहेत. त्यांचे वय वर्ष 65 आहे. शेतीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी बैलाच्या ठिकाणी स्वतःलाच औताला झुंपवून घेतले आहे. मागील सात ते आठ वर्षापासून याच प्रकारे ते काम करतात. यावर्षी शरीर थकले. हातपाय हलतात मान हलते मात्र नशिबी आलेली कष्ट काही संपत नाही. पेरणीपूर्व मशागत पेरणी बी, खतं यांचा खर्च परवडत नसल्याने ते आणि त्यांची पत्नी हे स्वतः शेतात काम करतात. ट्रॅक्टर बैलाचा नांगर यासाठी पैसे लागतात ते त्यांच्याकडे नाहीयेत. स्वतः केल्याशिवाय पर्याय नसल्याने औताला 65 वर्षाचा पती आणि 60 वर्षाची पत्नी असे मिळून काम करत आहेत.
आधुनिक महाराष्ट्रासाठी असे चित्र नक्कीच आशादायक नाही. शेतमालाला भाव नसणे. बियाणे खताची भाव वाढणे. मजुरीचा भाव वाढणे. याचा मेळ घालताना शेतकऱ्याला चांगलीच धावपळ करावी लागत आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीबाबत लकवा झालेलं धोरण यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अर्थकारण पार बिघडून गेलं आहे.
प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी पोस्ट करत बैल जोडी पाठवत असल्याचा दिला संदेश
लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेताच्या मशागतीसाठी बैल नाहीत म्हणून स्वतःच स्वतःला औताला जुंपले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यातून शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था आहे, याचं वास्तव साऱ्या जगाच्या पुढे आले होते. सोशल मीडियामुळं तो व्हिडिओ व्हायरल होत असताना प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून बैल जोडी पाठवत असल्याचं संदेश दिला होता. याबाबत त्यांनी आपल्या ट्वीटवर अकाउंट वरून ही माहिती दिली होती.