नवी दिल्ली : जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसमुळे भारतातही दहशतीचं वातावरण आहे. देशातील कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. इटलीमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील 16 जण कोरोनाग्रस्त आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेला आणि त्यांच्यासोबत असलेला एक भारतीय चालकही कोरोनाबाधित आहे. याशिवाय दिल्लीतील एक, हैदराबादमधील एक आणि आग्र्यातील सहा जण कोरोनाग्रस्त आहे. दिल्लीतील व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच आग्र्यातील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे सहा जण त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. सध्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 15 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आणखी 19 प्रयोगशाळांची निर्मिती सरकारकडून केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. तसंच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आता कसून तपासणी केली जात आहे. याआधी केवळ 12 देशांसाठी अॅडव्हायझरी जारी केली होती.


CoronaVirus | कोरोना व्हायरसची सहा जणांना लागण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

रुग्णालयांना स्वतंत्र वॉर्ड बनवण्याचा आदेश
देशातील सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड तातडीने बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश याआधीही रुग्णालयांना देण्यात आला होता. सहसचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी अनेक रुग्णालयांना भेट दिली आणि त्यांनी तिथे स्थापन केलेल्या सुविधांचा आढावाही घेतला, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.

देशात आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त चाचण्या
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की, भारतात तीन हजारांपेक्षा जास्त चाचणी झाल्या आहेत. 15 चाचणी प्रयोगशाळा आधीच बनवण्यात आल्या होत्या. आणखी 19 बनवण्यात आल्या आहेत, तर आठ प्रयोगशाळा काल सुरु झाल्या असून काही आज सुरु होतील.

3 किमी परिसरातील लोकांशी संपर्काची गरज
कोरोना व्हायरसची प्रकरणं जिथून समोर आली आहे, तिथल्या तीन किलोमीटरच्या परिसरात प्रत्येक घरात जाऊन लोकांशी संपर्क करण्याची गरज आहे. दिल्लीच्या रुग्णानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 66 जणांची ट्रेसिंग करण्यात आली आहे, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

Yoga For Corona | योगासनांचा कोरोनाविरोधात कसा फायदा होतो? रामदेव बाबांचं मार्गदर्शन

VIDEO | Corona Virus | कोरोना व्हायरस रोखणाऱ्या N95 मास्कचा मुंबईत तुटवडा