Top Taxpayers : दरवर्षी देशातील अभिनेते मोठ्या प्रमाणात कर (Tax) भरतात. जर आपण कर भरण्याच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच व्यक्तींवर नजर टाकली तर यामध्ये बॉलीवूडचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. शाहरुख खानला (Shah Rukh Khan) किंग खान असं म्हटलं जात. शाहरुख खान केवळ त्याच्या वर्चस्व आणि कमाईच्या बाबतीतच नाही तर कर भरण्याच्या बाबतीतही बॉलिवूडमध्ये अव्वल आहे. कर भरण्याच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच व्यक्तींमध्ये शाहरुख खानचे नाव अग्रस्थानी येते.


शाहरुख खान भरतो सर्वाधिक कर


2023-24 या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान एकूण 92 कोटी रुपयांचा कर भरून सर्वाधिक करदाता बनला आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी शाहरुखचे 'पठाण', 'जवान' आणि 'डिंकी' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये 'पठाण' आणि 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवीन विक्रम केला होता. 


अभिनेता विजय दुसऱ्या स्थानी


अभिनेता विजय हा तमिळ चित्रपट उद्योगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा करदाता आहे. कमाई आणि कर भरण्याच्या बाबतीत इतर लोक बॉलिवूडशी संबंधित नसून तमिळ चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत. विजयने अलीकडेच राजकीय पक्ष स्थापन करून चित्रपटांपासून दूर जाण्याचे संकेत दिले आहेत. विजयने सुमारे 80 कोटी रुपये कर भरला आहे. अशा प्रकारे विजय हा शाहरुख खाननंतर सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी बनला आहे.


तिसऱ्या क्रमांकावर सलमान खान


टॅक्स भरण्याच्या बाबतीत तिसरा क्रमांक येतो तो अभिनेता सलमान खान. 2023-2024 या आर्थिक वर्षात, सलमान खानने एकूण  75 कोटी रुपयांचा कर भरला आहे. 


बिग बी अमिताभ बच्चन यांचा चौथा क्रमांक 


बिग बी अमिताभ बच्चन यांना करदाता म्हणून चौथे स्थान मिळाले आहे. त्यांनी सलमान खानपेक्षा 4 कोटी रुपये कमी टॅक्स भरला आहे. म्हणजेच 71 कोटी रुपये टॅक्स भरून अमिताभ बच्चन यांनी टॉप 5 मध्ये आपले स्थान निश्चित केले.


कर भरण्यात क्रिकेटर विराट कोहलीचा 5 वा क्रमांक 


कर भरणाऱ्यांच्या पहिल्या 5 यादीत बॉलीवूडमधील तीन आणि दक्षिणेतील एका अभिनेत्याचा समावेश आहे, तर एका नॉन-अभिनेताला पाचवे स्थान मिळाले आहे. तो दुसरा कोणी नसून प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आहे. 66 कोटी रुपये कर भरून त्यांनी या यादीत पाचवे स्थान मिळवले.


महत्वाच्या बातम्या:


Mumbai Tax : देशाला सर्वात जास्त कर देणाऱ्या मुंबईला केंद्राकडून किती निधी परत मिळतो? आकडेवारी काय सांगतेय?