नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयामुळे टोल भरणाऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. राज्यासह देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीची सूट वाढवण्यात आली.

जुन्या नोटांचा तुटवडा, सुट्ट्या पैशांचा खोळंबा असल्याने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयापाठोपाठ राज्य सरकारनेही मुंबईसह महाराष्ट्रात टोलमाफीची सूट जाहीर केली आहे.

https://twitter.com/nitin_gadkari/status/798081612105674752

आणखी तीन दिवस टोलमाफी!


https://twitter.com/CMOMaharashtra/status/798134138842791936

त्यामुळे आता आणखी चार दिवस केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील महामार्गांवर टोल भरण्याची गरज नाही.

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच टोल सवलत जाहीर केली होती. मात्र चलन तुटवड्यामुळे या सवलतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद


 

मात्र 18 नोव्हेंबरनंतर टोलवर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे टोलच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला जाऊ शकतो.