Petrol, Diesel Prices Today: विधानसभा निवडणुका संपल्यापासून सुरु झालेली इंधन दरवाढ सलग तिसऱ्या दिवशीही पाहायला मिळाली. देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले. ज्यानंतर दिल्ली पेट्रोलची किंमत 90.99 आणि डिझेलची किंमत 81.42 रुपयांवर पोहोचली. 


मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर प्रती लीटरमागे अनुक्रमे 97.34, 92.90, 91.14, 94.01 इतके असल्याचं पाहायला मिळालं. तर डिझेलचे दर प्रती लीटरमागे अनुक्रमे 88.49, 86.35, 84.26, 86.31 इतके असल्याचं निदर्शनास आलं. 


तीन दिवसांत किती फरकानं दरवाढ? 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमतीत होणारी वाढ कायम आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचे दर सात आठवड्यांतील सर्वाधिक उंचीवर पोहोचले होते. परंतु अनेक राज्यांमध्ये असणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. त्यादरम्यानच्या दिवसांमध्ये पेट्रोल 77 पैशांनी तर, डिझेल 74 पैशांनी स्वस्त झालं होतं. पण, मागच्या तीन दिवसांपासून इंधन दरवाढ सुरुच असून, पेट्रोल 62 पैसे आणि डिझेल 69 पैशांनी महाग झाल्याचं कळत आहे. 


महाराष्ट्रात काय आहेत पेट्रोल- डिझेलचे दर? 




पर्यटकांनो लक्ष द्या! हिमाचल प्रदेशामध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु राहणार, काय बंद 


कुठे आणि कसे पाहता येतील पेट्रोल डिझेलचे दर ? 


इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल- डिझेलच्या दरांची माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा पिन कोड टाईप करुन 9224992249 या क्रमांकावर एस मेसेज पाठवावा लागतो. 


दर दिवशी सकाळी 6 वाजता निर्धारित होतात दर 


पेट्रोल आणि डिझेलचे दर दर दिवशी सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नव्या किंमती लागू होतात. या इंधनाच्या दरांमध्ये कैक कर, एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतरही दर जोडले जातात. ज्यामुळे इंधनाचे दर मोठ्या फरकानं वाढतात. याच निकषांच्या आधारावर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर निर्धारित करतात.