Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील कनिगम भागात गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचं दिसून आलं. सूत्रांच्या माहितीनुसार अल- बद्र या दहशतवादी संघटनेत नव्यानं आलेल्या 4 स्थानिक दहशतवाद्यांचा यामध्ये सहभाग होता. सध्या मिळत असणाऱ्या माहितीनुसार पोलीस आणि लष्करानं या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. 


Covid 19 Treatment : 'रोश'च्या अँटीबॉ़डी कॉकटेलला भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी 


सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरुच 


जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात असणाऱ्या कनिगम क्षेत्रात काही दहशतवादी असल्याची माहिती त्यांना मिळाली. ज्यानंतर तातडीनं या भागाला छावणीचं स्वरुप आलं. दहशतवाद्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तौसिफ अहमद नावाच्या दहशतवाद्यानं शरणागती पत्करली, तर उरलेल्या तिघांना कंठस्नान घालण्यात आलं. 










मंगळवारीही झाली होती चकमक 


मंगळवारी जम्मू काश्मीरमधील सोपोर इथं लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. सोपोर येथे असणाऱ्या नाथीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. यामध्ये लष्कराला आपला सुगावा लागल्याचं कळताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. त्याला उत्तर देत करण्यात आलेल्या गोळीबारात 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.