नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरु आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान सेंट्रल ड्रग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशन अर्थात CDSCO ने स्विर्त्झलँडची फार्मा कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेलच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. रोश (Roche) आणि रेजेनरॉन (Regeneron) यांनी एकत्रित विकसित केलेल्या अँटिबॉडी-ड्रग कॉकटेल कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इमदेवमॅब  (Imdevimab) च्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.


रोश कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं की, भारतात कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इमदेवमब  (Imdevimab) यांना दिलेली मान्यता अमेरिका आणि युरोपियन संघ  येथील आपत्कालीन वापरासाठीचा डेटा आणि युनियनमध्ये मानवी वापरासाठी औषधी उत्पादनांच्या वैज्ञानिक समितीच्या  अभिप्रायांच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की हे कॉकटेल प्रौढ आणि लहान मुलांना (12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वजन कमीतकमी 40 किलो) सौम्य आणि मध्यम कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते.






भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची रुग्णालयात दाखल करणे कमी होणे आणि आरोग्य सेवेवरील दबाव कमी करण्यासाठी रोच वचनबद्ध आहेत, असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे. 


कोरोनाची तिसरी लाट येणार 


 


केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच तिसरी लाट नक्की येणार असा दावाही त्यांनी केला आहे. विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बऱ्यास केसेस समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही.


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 382,315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3780 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात यापूर्वी एक मे रोजी 3689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 6 लाख 65 हजार 148
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 69 लाख 51 हजार 731
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 34 लाख 87 हजार 229
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 26 हजार 188
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 डोस



इतर बातम्या