मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक अनुयायी विविध मार्गाने आपल्या डॉ. आंबेडकरांना मानवंदना देत असतात. कोरोनानंतर पहिल्यांदा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य सरकारच्या वतीने साजरी केली जाणार आहे. मुंबईतील दादर स्थित चैत्यभूमी स्मारक अभिवादन कार्यक्रम होणार आहे
आलिया आणि रणबीर आज विवाहबंधनात अडकणार
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये उद्या आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत.
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजतार टायन्स संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघानेही पहिल्या चार सामन्यात तीन विजय मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांघाईतील भारतीय दूतावासातील 'इन-पर्सन' सेवा बंद
चीनच्या शांघाईमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय वाणिज्य दूतावासात 'इन-पर्सन' सेवा म्हणजे दूतावास परिसरात जाऊन भेटण्यास बंदी घातली आहे.