मुंबई: आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


राणा दाम्पत्याला आज कोर्टात हजर करणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं आहे. 


'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. 


किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला आणि त्यावरील प्रतिक्रिया
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत वांद्रे पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले असून आज दिवसभर यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आज संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित दिसणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. खरं तर, उद्या म्हणजेच रविवारी, 24 एप्रिल रोजी, स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


मुंबईकर आज पुन्हा मैदानात, समोर लखनौचं आव्हान
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईने सलग सात सामने गमावल्याने जवळपास ते स्पर्धेबाहेर गेले आहेत. पण तरी त्यांच्यासारख्या एका अव्वल दर्जाच्या संघाचा सामना सर्वच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असतो. त्यांच्या समोर आव्हान असणाऱ्या लखनौची यंदाची कामगिरी दमदार आहे. त्यांनी 7 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना आज विजयाची अत्यंत गरज असून मुंबईलाही पहिल्या विजयाची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. 


क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्वोत्तम खेळाडू समजला जातो. त्याचा आज वाढदिवस आहे. 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे.