नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची लोकसभेतील (Lok Sabha) सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 


'पैसे घेऊन प्रश्न' विचारण्याच्या आरोपाबाबतच्या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारस समितीने केली होती. र्शन हिरानंदानी यांच्या रोख व्यवहार प्रकरणाच्या चौकशीची शिफारस भारत सरकारला करण्यात आली होती.  या प्रकरणावर लोकसभेत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा करण्याती आली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांना देखील बोलण्याची संधी देण्यात आली. 


महुआ मोईत्रा यांनी काय म्हटलं?


खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता.


महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप काय?


भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की, मोइत्रा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देहद्राईने अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाच व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.


महुआ मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अलीकडच्या काही दिवसांपर्यंत महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी समूहावर केंद्रित होते.


दरम्यान, उद्योगपती हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूलच्या खासदाराला पैसे दिल्याचा आरोप आहे.


यानंतर या प्रकरणाची एथिक्स कमिटीत सुनावणी झाली, मात्र तेथेही गदारोळ झाला. महुआसोबत समितीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी समितीने वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. महुआला विचारण्यात आले की ती रात्री कोणाशी बोलते? नंतर महुआने असेही सांगितले की एथिक्स कमिटी तिला घाणेरडे प्रश्न विचारत होती आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला. 


हेही वाचा :