Mayawati : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी स्वकीयांमधील विश्वासघातकी आणि विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला आहे. मायावतींनी रविवारी एकामागून एक 3 ट्विट केले. त्यांनी लिहिले की, बसपाला कमकुवत करण्यासाठी जातीयवादी शक्ती पडद्याआडून कट करत आहेत, बसपाला कमकुवत करण्यासाठी अनेक संघटना तयार करण्यात आल्या आहेत. त्यांचा खरा हेतू त्यांचा स्वार्थ सिद्ध करणे हा आहे. या ट्विटद्वारे त्यांनी भाऊ आनंद यांचे कौतुक केले.


मायावती म्हणतात की, दलित आणि उपेक्षितांमध्येही स्वार्थी लोकांची कमतरता नाही, ज्यात माझे काही नातेवाईक आहेत आणि एक असा आहे जो माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयच्या छाप्यानंतर माझ्या अनुपस्थितीत कुटुंबासह निघून गेला, तेव्हापासून लहान भाऊ आनंद सरकारी नोकरी सोडून कुटुंबासह माझी आणि पक्षाची सेवा करत आहे. 


बामसेफ आणि DS-4 कागदी संघटना 


मायावतींनी बामसेफ (BAMCEF) आणि DS-4 चे कागदी संघटना म्हणून वर्णन केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, या स्वार्थी प्रकारच्या लोकांनी विशेषत: BAMCEF आणि DS4 इत्यादी नावाने अनेक प्रकारच्या कागदी संघटना तयार केल्या आहेत, ज्या सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या नादात आपला स्वार्थ सिद्ध करत आहेत आणि आता काही लोक बसपामध्ये निष्क्रिय झाले आहेत ते सुद्धा दुसऱ्या मार्गाने तेच करत आहेत, हे दुर्दैव आहे.'






जातीयवादी शक्ती बसपा विरोधात कट रचत आहेत


जातीयवादी शक्ती पडद्याआडून बसपाविरोधात कट रचत असल्याचा आरोप बसपा अध्यक्षांनी केला. तिसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, अशा प्रकारे जातीयवादी शक्ती बसपाला कमकुवत करण्यासाठी पडद्याआडून षड्यंत्र रचत आहेत. त्याचवेळी त्यांना कागदी पक्ष बनवून निवडणुकीत दलित आणि शोषितांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्राणघातक प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत पक्ष आणि चळवळीच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 




इतर महत्त्वाच्या बातम्या