नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेसने त्यावर सडकून टीका केली आहे. देशातील महागाई आणि कोरोना कार्यकालातील कामगिरी लक्षात घेता हे गेल्या 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार आहे असं कांग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.


 






रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "देशाला एका बिनकामी आणि दुर्बल सरकारचं ओझं वाहताना आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे परिणाम देश भोगतोय कारण या सात वर्षाच्या कालावधीत बेरोजगारी 11.3 टक्क्यांनी वाढलीय. अनेक भागात पेट्रोल 100 रुपयांवर गेलं आहे तर खाद्य तेलाच्या किंमती 200 रुपयांवर गेल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गेल्या 73 वर्षाच्या इतिहासाती सर्वात दुर्बल सरकार आहे."


देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकुळ घातला असताना याला जबाबदार केवळ मोदीच असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या काळात मोदींनी इतरांच ऐकलं नाही, वेळ घालवला त्यामुळे देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं नुकसान सहन करावं लागलं असं काँग्रेसनं म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीत केवळ तिरस्कार पसरवला असाही आरोप त्यांनी केला. 


 






महत्वाच्या बातम्या :