बिहारमध्ये ऩक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 04:28 AM (IST)
NEXT PREV
पाटणा : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात दहा जवान शहीद झाले आहेत. आयईडीच्या हल्ल्यासह नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या कोबरा बटालियनवर जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या हल्ल्यात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. या हल्ल्यात सहभागी असलेल्या नक्षलींचा औरंगाबाद-गयाच्या जंगलात शोध सुरु आहे. हल्ल्यात दहा जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी जवानांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.